छोट्या शाल्मलीने वाजविलेला पियानो पंतप्रधान मोदींनाही भलताच आवडला!

लहान वयात या मुलीचे टॅलेंट पाहून युजर्स आश्चर्यचकित

छोट्या शाल्मलीने वाजविलेला पियानो पंतप्रधान मोदींनाही भलताच आवडला!

सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती पियानो वाजवताना दिसत आहे. एवढ्या लहान वयात या मुलीचे टॅलेंट पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. युजर्स तिचे भरभरून कौतुक करत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुलीच्या टॅलेंटचे फॅन झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिटिओ ट्विव्ट करताना ते म्हणतात, हा व्हिडिओ सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. विलक्षण प्रतिभा आणि सर्जनशीलता. शाल्मलीला खूप खूप शुभेच्छा!

हा व्हिडिओ @anantkkumar ट्विटर युजरने शेअर केला आहे. त्याला आतापर्यंत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर व्हिडिओवर शेकडो युजर्सनी प्रतिक्रियांनाही पाऊस पडला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बॅकग्राऊंडमध्ये पल्लवगला पल्लवयाली हे कन्नड गाणे गात आहे. ती मुलगी या गाण्याच्या तालावर पियानो वाजवत आहे.

हेही वाचा : डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?

मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता

पाकिस्तानात पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला, १२ पोलिस ठार, ४० जखमी

ठाणे पोलीस आयुक्तांसह एटीएस प्रमुख बनले ‘पोलीस महासंचालक’

शाल्मली असे या मुलीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. गाण्याच्या मध्ये ही मुलगी गाणं गुणगुणतानाही दिसत आहे. तिचा गोड आवाज आणि गोंडस हास्याने लोकांची मने तिने जिंकली आहेत. तिच्या पियानोच्या सूराने लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. विशेष म्हणजे शाल्मली एका हाताने पियानो वाजवत आहे. तिची विलक्षण प्रतिभा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे मनापासून कौतुक केले आहे.

पल्लवगला पल्लवयाली हे गाणे कन्नड कवी के. एस. नरसिंह स्वामी यांनी लिहिले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला या ओळी गुणगुणताना आहे. ज्यावर शाल्मली उत्तमरित्या पियानो वाजवत आहे.

Exit mobile version