स्वातंत्र्यादिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही, कुटुंबवादावर जोरदार हल्ला चढवला होता. तसेच पंतप्रधान मोदींनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला. आज भ्रष्टाचार करणाऱ्यांचा गौरव होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी देशातील जनतेचे सहकार्य आणि पाठिंबा मागितला आहे.
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यादिनानिमित्त भाषण करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी तरुणांपासून महिलांपर्यंतचा उल्लेख केला. यानंतर त्यांनी भ्रष्टाचार आणि कुटुंबवादावर जोरदार प्रहार केले. या दोन वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधानांनी देशातील जनतेला मदत करण्याचे आवाहन केले आहे. या दोन गोष्टींचा नायनाट झाला नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. मोदी सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याच्याही मोदींनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
राणा अयुबने चक्क सलमान रश्दींचे समर्थन केले मग केले ट्विट डिलिट
देशाचै पाऊल लवकरच ५ जी मोबाईल युगाकडे
मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकीचा काॅल
संस्कृती, परंपरेचे दर्शन घडवणारा कन्नड सिनेसृष्टीचा व्हीडिओ व्हायरल
पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा मी घराणेशाहीचा उल्लेख करतो तेव्हा लोकांना वाटते की मी केवळ राजकीय क्षेत्राबद्दल बोलत आहे. पण राजकीय क्षेत्रात फक्त नाही तर इतर क्षेत्रातही घराणेशाही दिसत आहे. राजकारणातही कौटुंबिक राजकारणाने खूप नुकसान केले आहे. कौटुंबिक राजकारण हे कुटुंबासाठी असते, त्याचा देशाशी काही संबंध नाही. भारतातील सर्व संस्थांच्या शुद्धीकरणासाठी गुणवत्तेच्या जोरावर देशाचा विकास करूया आणि भारताचे राजकारण शुद्ध करूया, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.