पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पहिले भाजपचे सक्रिय सदस्य!

‘सक्रिया सदस्यता’ मोहिमेला प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पहिले भाजपचे सक्रिय सदस्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाजप सदस्यत्वाचे नूतनीकरण केले आणि ‘सक्रिया सदस्यता’ मोहिमेदरम्यान पक्षाचे पहिले “सक्रिय सदस्य” बनले आहेत. भाजपने नुकतेच सक्रिय सदस्यता अभियान सुरू केले आहे. पंतप्रधानांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत ‘सक्रिय सदस्यतासाठी नावनोंदणी केली.

भाजपच्या सक्रिय सदस्याला एका बूथवर किंवा विधानसभेच्या जागेवर पक्ष सदस्य म्हणून किमान ५० जणांची नोंदणी करावी लागते. सदस्यत्व मोहीम संपल्यानंतर सुरू होणाऱ्या पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीत फक्त सक्रिय सदस्यच भाग घेऊ शकतात, असे या मोहिमेचे नियम सांगतात.

याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, भाजप कार्यकर्ता म्हणून पहिले सक्रीय सदस्य बनल्याचा आणि आज सक्रीय सदस्यता अभियान सुरू केल्याचा अभिमान वाटतो. ही एक चळवळ आहे जी आणखी मजबूत होणार आहे. आमचा पक्ष तळागाळात आहे आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी आमच्या पक्ष कार्यकर्त्यांचे प्रभावी योगदान सुनिश्चित करू. पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना आगामी काळात पक्षासाठी काम करण्याच्या अनेक संधी मिळतील, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा : 

हा बघा काँग्रेस नेत्याचा प्रताप !

भारतात प्रवेश करताना चार बांगलादेशींना अटक!

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!

४८ तासात १३ विमान कंपन्यांना धमक्या !

दर सहा वर्षांनी भाजप नवीन सदस्यत्व मोहीम राबवते. भाजपच्या प्रत्येक विद्यमान सदस्यालाही नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे, तर नवीन सदस्यही जोडले जातील. २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या २०२४ सदस्यत्व मोहिमेची सुरुवात ‘संघटन पर्व, सदस्यता अभियान २०२४’ करून त्यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करून आणि पक्ष कार्यकर्त्यांना तरुणांशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. पहिल्या दिवशी ४७ लाख सदस्यांची नोंदणी झाली. पहिल्या टप्प्यात २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान नवीन नोंदणी मोहिमेअंतर्गत ६ कोटी सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

Exit mobile version