सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागितली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सिंधुदुर्गात जे झालं. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाहीये. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी ‘शिवाजी महाराज आराध्य दैवत’ आहेत. मी डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागितली.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राजकारण करायला सुरुवात केली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर माफी मागितली होती. मात्र, विरोधक आरोप करत टीका करत होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने त्यांनी माफी मागायलाच हवी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा असल्याचे सर्वांच्या नजरा त्यांच्या भाषणाकडे होत्या. परंतु भाषणाची सुरुवात करतानाच पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत असून मी नतमस्तक होवून त्यांची माफी मागत असल्याचे जाहीर केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या हृदयातल्या भावनांना व्यक्त करणार आहे. २०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निश्चित केले. तेव्हा सर्वात प्रथम रायगडला जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधी स्थळाजवळ बसून प्रार्थना कली होती, आराध्य दैवताचे दर्शन घेवून ‘राष्ट्र सेवेच्या नव्या यात्रे’चा आरंभ केला होता.
हे ही वाचा :
आंध्रमधील महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहातील वॉशरूममध्ये कॅमेरा; ३०० हून अधिक छायाचित्रे लीक
काँग्रेसच्या भूपेंद्र सिंह हुड्डांवर ईडीची कारवाई, ८३४ कोटींची मालमत्ता जप्त!
दहा वर्षांत फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; स्टार्टअपमध्ये ५०० टक्क्यांची वाढ
विष पेरणाऱ्या २४ मशिदींवर ब्रिटनची नजर, दोषी आढळल्यास मौलवीला १४ वर्षांची शिक्षा !
पंतप्रधान मोदी म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे झालं, ते माझ्यासाठी आणि आमच्या साथीदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी राजा, महाराजा, राज पुरुष नाहीये. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ‘आराध्य दैवत’ आहेत. मी आज डोक झुकवून माझ्या आराध्य दैवतेची, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होवून मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते लोक नाही जे भारत मातेचे महान सुपुत्र वीर सावरकरांना शिव्या देतात. देशभक्तांच्या भावनांचा चुराडा करतात.
ते पुढे म्हणाले, सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टामध्ये जाऊन यांची लढण्याची तयारी आहे, महापुरुषाचा अपमान करून यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावे. मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे, हे आमचे संस्कार आहेत. जे लोक शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी डोके झुकवून माफी मागतो, आमचे संस्कार वेगळे आहेत, आमच्या आराध्य दैवतापेक्षा काहीच मोठे नाही, अशी भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.