पंतप्रधान मोदींचे रशियात जंगी स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित!

पुतीन यांची लवकरच घेणार भेट

पंतप्रधान मोदींचे रशियात जंगी स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित!

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यासाठी मॉस्कोला पोहचले आहेत. पंतप्रधान मोदींचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतूरो यांच्या हस्ते विमानतळावर पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, गेल्या पाच वर्षातील पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे आणि तिसऱ्या कार्यकाळातील त्यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ऊर्जा आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या संधी शोधण्यासाठी शिखर परिषद होणार आहे.

पंतप्रधान मोदी पाच वर्षात पहिल्यांदाच रशियाला पोहचले आहेत. तिसऱ्या कार्यकाळातील त्यांचा हा पहिला द्विपक्षीय परदेश दौरा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी रशियाला गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी व्लादिवोस्तोक येथे एका आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर पोहचले आहेत. रशियाचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियाला रवाना होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा ९ आणि १० जुलै असा ऑस्ट्रिया दौरा असणार आहे. ४१ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांची ही भेट असणार आहे. यापूर्वी १९८३ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली होती.

हे ही वाचा:

वरळी अपघात प्रकरण – मिहीर शहा विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी!

काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घरातील कपाटाच्या मागे खोदला होता बंकर

वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शाह यांना जामीन मंजूर !

मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय?

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्थानिक वेळेनुसार पंतप्रधान मोदींसोबत संध्याकाळी ७ ते ९ दरम्यान डिनर आणि बैठकीचे आयोजन केले आहे. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात मंगळवारी (९ जुलै ) २२ वी वार्षिक शिखर परिषद होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार, ऊर्जा, संरक्षण यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. आतापर्यंत भारत आणि रशियामध्ये २१ वार्षिक शिखर परिषदा एकामागून एक झाल्या आहेत. शेवटची शिखर परिषद ६ डिसेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे पार पडली होती.

Exit mobile version