पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या प्रचारा दरम्यान केलेल्या एका वक्तव्याचा संबंध विरोधकांकडून मुस्लिम समाजाशी जोडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांना उद्देशून बोलले असा प्रचार विरोधी पक्षाकडून सुरु होता.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण दिलं आहे.’हिंदू-मुस्लिम राजकारण करायच नाही, हा माझा संकल्प आहे. ज्या दिवशी मी हे असं सुरु करेन, त्या दिवसापासून सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य नसेन’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.अर्ज भरण्याच्या अगोदर पंतप्रधान मोदींनी एका वृत्त वहिनीला मुलाखत दिली तेव्हा ते बोलत होते.यावेळी पंतप्रधानांना प्रश्न विचारला की, तुम्ही एका भाषणात घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं, असे वक्तव्य केले होते.हे वक्तव्य मुस्लिम समाजासाठी होते का?, असे पंतप्रधान यांना विचारण्यात आले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी केलेलं वक्तव्य मुस्लिमांसाठी नव्हतं.मला धक्का बसला, कोणी सांगितलं तुम्हाला, जेव्हा एखादा माणूस ज्यांना जास्त मुल आहेत, त्या बद्दल बोलतो, त्याचा अर्थ मुस्लिमांशी जोडता. तुम्ही मुस्लिमांवर हा अन्याय करत नाही का? मी हिंदू-मुस्लिम करणार नाही, हा माझा संकल्प आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘मोदींसारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा’
चिनी फंडिंगचे आरोप असलेल्या ‘न्यूज क्लिक’च्या संपादकांची अटक अवैध
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने गोळी झाडून केली आत्महत्या!
दिल्लीच्या विजयामुळे राजस्थान प्लेऑफमध्ये!
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी आम्ही ना हिंदू म्हटले ना मुस्लिम.आपल्या इकडे कोणत्याही समाजात जिथे गरिबी असते, तेथे मुलांची संख्या अधिक असते.आमचे एवढेच म्हणणे आहे की, आपल्या मुलांचे पालन-पोषण करता येईल तेवढीच मुले असावीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.