पंतप्रधान मोदींचे बंधू रुग्णालयात दाखल

मूत्रपिंड आजाराने आहेत ग्रस्त

पंतप्रधान मोदींचे बंधू रुग्णालयात दाखल

पंतप्रधान मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नई स्थित अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रल्हाद मोदी यांची प्रकृती मूत्रपिंड संबंधित आजारामुळे खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रह्लाद मोदी यांना मूत्रपिडावरच्या आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा ते दोन वर्षाने लहान असून त्यांचे निवासस्थान अहमदाबाद येथे आहे.

कोण आहेत प्रल्हाद मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबात एकूण त्यांच्यासह पाच भावंडे आहेत. प्रल्हाद मोदी हे भावंडांमध्ये चौथ्या क्रमांकाचे आहेत. ते अहमदाबादचे असून त्यांचे किराणामालाचा आणि    टायरचा व्यवसाय करतात. प्रल्हाद मोदी याआधी २०१८ साली चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी गुजरात राज्यात आंदोलन केले होते. गुजरात ‘फेअर प्राईझ शॉप’ आणि ‘केरोसीन लायसन्स होल्डर्स’ यांच्यामध्ये वाद झाला होता. हाच वाद निवळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते पण काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर प्रल्हाद मोदी यांनी बंद पुकारला होता. त्यावेळेस ते गुजरात फेअर प्राईझ शॉप ऑनर्सचे अध्यक्ष होते.

हे ही वाचा:

वकील प्रवीण चव्हाण गजाआड… कालिया, सांबा अडकले, गब्बर सिंगला अटक कधी?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवा!! NIAने केले मुंबई पोलिसांना सतर्क

भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू कसे शकतात?

पंतप्रधान मोदी यांना किती भावंडे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबात एकूण त्यांच्यासह पाच भावंडे आहेत. त्यापैकी एक बहीण आणि चार भाऊ आहेत. सोमा मोदी, अमृत मोदी, नरेंद्र मोदी, प्रल्हाद मोदी, पंकज मोदी आणि एक बहीण वासंती मोदी असे आहेत. पंतप्रधानांच्या मोठ्या भावाचे नाव सोमा मोदी असून ते आरोग्य विभागातून निवृत्त झाले आहेत आणि ते अहमदाबाद मधेच सध्या वृद्धाश्रम चालवत आहेत.

Exit mobile version