‘लखपती दीदी’ संमेलनासाठी माता भगिनींचा जमला महासागर !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘लखपती दीदी’ संमेलनासाठी माता भगिनींचा जमला महासागर !

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्हात ‘लखपती दीदी’ मेळावा पार पडला. पंतप्रधान मोदींची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यात महिलांचा प्रचंड सहभाग पाहायला मिळाला. या सोहळ्याला तब्बल एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी संमेलन सोहळा प्रसंगी केलेले भाषण करत लखपती दीदी संमेलनासाठी ‘माता भगिनींचा महासागर’ जमला असल्याचे म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, जळगाव जिल्हा सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील भगिनी सोन्यापेक्षाही अनमोल असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असल्याने त्यांचे अभिनंदन केले.

महिला सशक्तीकारणासाठी सरकारने चालू केलेल्या विविध योजनांची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. ते म्हणाले, ‘अन्नपूर्णा योजने अंतर्गत’ तीन गॅस सिलिंडर सरकार देत आहे. उच्च शिक्षण मोफत, प्रवासात सवलत आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सरकार करत आहे. तसेच महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक; ९६० लोकल फेऱ्यांवर होणार परिणाम

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आरक्षणविरोधी

बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात अमरावतीत आक्रोश !

महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकारणावरील हिंदुत्ववाद्याची व्यथा!

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांच्या स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. २५ हजार ३० कोटींची कर्जे स्वयं सहायता गटांना देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली.
कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री महोदयांनी लक्ष घालावे. याशिवाय, सिंचन प्रकल्पांना मदत करावी. नेपाल येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीय प्रती पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version