29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषपंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ!

पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ!

२६ जूनला होणार लोकसभा अध्यक्षाची निवड

Google News Follow

Related

१८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. आज आणि उद्या नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ घेतली आहे. तसेच पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर, इतर केंद्रीय मंत्र्यांसह २८० खासदार शपथ घेणार असून मंगळवारी २६४ नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत.

लोकसभा अध्यक्षांची निवड देखील २६ जून रोजी होणार आहे, त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशनाचा समारोप ३ जुलै रोजी होणार आहे.दरम्यान, लोकसभेत शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा:

जरांगे म्हणतायत, मुस्लिमांना आरक्षण द्या, नाहीतर बघून घेतो!

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा!

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये निर्माण होणार ‘संविधान मंदिर’

धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते. तर देश चालवण्यासाठी सहमतीची गरज असते. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतली जातील आणि देशाच्या हिताचे काम व्हावे यासाठी आमचे सरकार काम करेल. तिसऱ्या कार्यकाळात आमचे सरकार तिप्पट मेहनत करेल आणि देशाच्या तीनपट विकास करेल. भारताला लवकरच गरिबीतून मुक्त करणार, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा