सात वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी घेतला होता ऐतिहासिक निर्णय; ‘नोटबंदी’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात उतरवल्या

सात वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी घेतला होता ऐतिहासिक निर्णय; ‘नोटबंदी’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली. हा दिवस देशाच्या इतिहासात नोंदवला गेला. रात्री ८ वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवर देशवासियांना संबोधित करून नोटबंदीची घोषणा केली. ८ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपासून त्यांनी नोटबंदी लागू होत असल्याची घोषणा केली. चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याचे जाहीर करण्यात आले.

नोटबंदीच्या घोषणेने सर्वसामान्यच नाही तर व्यापारी, उद्योजक आणि एकूणच समाजातील सर्वच स्तरावरील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर या ऐतिहासिक निर्णयामुळे काही काळ लोकांमध्ये संभ्रमदेखील निर्माण झाला होता. घरात, खिशात असलेल्या नोटांचे कारायचे काय? असा गहन प्रश्न उभा राहिला होता. मात्र, या बंद केलेल्या नोटा बँकेतून बदलून मिळतील या सुचनेनंतर नागिरकांना काहीसा दिलासा मिळाला. याशिवाय काही ठिकाणी व्यवहार करताना या नोटा वापरून संपवता येतील, असंही सांगण्यात आले.

नोट बंदीच्या या निर्णयानंतर देशातील बँकांच्या बाहेर नागरिकांच्या रांगाचं रांगा लागल्या होत्या. पुढे कित्येक महिने देशातच नाही तर परदेशात पण त्यावर चर्चा रंगल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात उतरवल्या. त्यांना ‘महात्मा गांधी न्यू सीरीज ऑफ नोट्स’ असे नाव देण्यात आले. २ हजारांची नवी कोरी गुलाबी नोट चर्चेत आली. या नोटेबद्दल अनेक अफवा देखील पसरल्या होत्या. या नोटा चलनात आल्याने काळ्या व्यवहारावर आळा बसून व्यवहार सोपा होण्याचा केंद्राचा दावा होता. या ऐतिहासिक अशा नोटबंदीच्या एका निर्णयाने त्यावेळी देशातील ८६ टक्के नोटा एका झटक्यात चलनाबाहेर झाल्या.

प्रामुख्याने नोटबंदी मागे दिलेली कारणे

हे ही वाचा:

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी त्याचं व्यक्तीच्या मृत्यूच्या शिक्षेवर पाकिस्तानात होणार सुनावणी

अफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!

जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त

पुढे चर्चेत आलेली ही दोन हजारांची नोट २०२३ साली चलनातून बाहेर काढण्यात आली. २३ मे ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत गुलाबी नोटा बदलण्याची वेळ देण्यात आली. ३० सप्टेंबर रोजी ही डेडलाईन ७ ऑक्टोबर २०२३ रोजीपर्यंत वाढविण्यात आली. पण, यावेळी तुलनेने जनतेला कमी त्रास झाला कारण पूर्वनियोजित पद्धतीने २ हजारांच्या नोटा अगोदरच चलनातून कमी झाल्या होत्या.

Exit mobile version