29.9 C
Mumbai
Thursday, May 15, 2025
घरविशेषअन्नदात्यांना पंतप्रधान मोदींनी सलाम

अन्नदात्यांना पंतप्रधान मोदींनी सलाम

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१व्या भागात देशभरातील अशा अन्नदात्यांचा उल्लेख केला ज्यांनी आपल्या शेतीच्या माध्यमातून ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवले. या यादीत कर्नाटक, राजस्थानसह इतर राज्यांतील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. ‘जिथे इच्छा तिथे मार्ग’ या म्हणीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी कर्नाटकमध्ये सफरचंद पिकवणाऱ्या, हिमाचल प्रदेशातील सांगला खोर्‍यात केशर पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसह दक्षिण भारत आणि राजस्थानमध्ये लीची उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा उल्लेख केला.

पंतप्रधान म्हणाले, “मित्रांनो, एक जुनी म्हण आहे ‘जिथे इच्छा तिथे मार्ग’. जेव्हा आपण काहीतरी नवीन करण्याचा निर्धार करतो, तेव्हा यश नक्कीच मिळते. तुम्ही डोंगरांमध्ये उगवणारी सफरचंदे खाल्ली असतील. पण मी विचारतो की तुम्ही कर्नाटकच्या सफरचंदांचा स्वाद घेतला आहे का? तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सामान्यतः आपण समजतो की सफरचंद फक्त डोंगराळ भागातच उगवतात, पण कर्नाटकमधील बागलकोट येथील श्री शैल तेली यांनी माळरान भागात सफरचंद पिकवले आहेत. त्यांच्या कुलाळी गावात ३५ अंशांपेक्षा जास्त तापमान असतानाही सफरचंदाची झाडे फळ देत आहेत.

हेही वाचा..

पहलगाम हल्ला: आतापर्यंत ९ दहशतवाद्यांची घरे उध्वस्त!

१३० अणुबॉम्ब भारतासाठी ठेवलेत…

पंतप्रधान पुढे म्हणाले, “श्री शैल तेली यांना शेतीची आवड होती, म्हणून त्यांनी सफरचंद शेतीचा प्रयोग केला आणि त्यात यश मिळवले. आज त्यांच्या लावलेल्या सफरचंदाच्या झाडांवर चांगल्या प्रमाणात सफरचंद येत आहेत आणि त्याच्या विक्रीतून त्यांना चांगली कमाईही होत आहे.”

‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी आणखी काही शेतकऱ्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मित्रांनो, आता जेव्हा सफरचंदांचा विषय निघालाय, तेव्हा तुम्ही किन्नौरी सफरचंदाचे नाव नक्की ऐकले असेल. सफरचंदासाठी प्रसिद्ध असलेल्या किन्नौरमध्ये आता केशराचे उत्पादन होऊ लागले आहे. हिमाचलमध्ये सामान्यतः केशराची शेती फारशी होत नव्हती, पण आता किन्नौरच्या सुंदर सांगला खोर्‍यातही केशराची लागवड होऊ लागली आहे. असाच एक उदाहरण केरळमधील वायनाडचे आहे, जिथे एरोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे केशर उगवण्यात यश मिळाले आहे.

असेच एक आश्चर्यकारक कार्य लीचीच्या उत्पादनात झाले आहे. आपण ऐकत आलो होतो की लीची बिहार, पश्चिम बंगाल किंवा झारखंडमध्येच उगवते. पण आता लीचीचे उत्पादन दक्षिण भारत आणि राजस्थानमध्येही सुरू झाले आहे. ते पुढे म्हणाले, “तमिळनाडूमधील थिरु वीरा अरासू कॉफीची शेती करत होते. कोडाईकनालमध्ये त्यांनी लीचीची झाडे लावली आणि सात वर्षांच्या मेहनतीनंतर आता त्यांच्या झाडांवर फळे यायला लागली आहेत. लीची शेतीत मिळालेल्या यशामुळे आसपासच्या इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. राजस्थानमध्ये जितेंद्र सिंह राणावत यांनी लीची पिकवण्यात यश मिळवले आहे. ही सर्व उदाहरणे अतिशय प्रेरणादायी आहेत. जर आपण काहीतरी नवीन करण्याचा निश्चय केला आणि कठीण परिस्थितीतही चिकाटीने टिकून राहिलो, तर अशक्य गोष्टीही शक्य होतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा