पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (५ एप्रिल) राजस्थानमधील चुरु येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले.यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या कामाची गणना केली.आतापर्यंत केलेले काम हे फक्त ट्रेलर असल्याचे त्यांनी सांगितले. तिहेरी तलाकची प्रथा रद्द केल्याचा दाखल देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला संरक्षण दिले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत जे काही केले ते केवळ ट्रेलर आहे.आपल्याला खूप काही करायचे आहे, बरीच स्वप्ने बाकी आहेत.देशाला खूप पुढे न्यायचे आहे.ते म्हणाले की, काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते.हा नवीन भारत आहे जो देशात घुसतो आणि मारतो. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ३७० कलम हटवण्यापासून ते तिहेरी तलाकवर बंदी घालण्यापर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला.
हे ही वाचा:
राहुल गांधींना ‘उभे’ राहण्याचीही शिस्त नाही का?
हेमंता बिस्वा सरमा यांनी दिली इंडियन एक्सप्रेसला नोटीस
दादरच्या प्रकाश हॉटेलात स्मिथ, ब्रॉडने खाल्ले थालीपीठ, साबुदाणा वडा!
म्हणे प्रपोगंडा फिल्म… ‘द केरळ स्टोरी’ प्रसारणाला विजयन यांचा विरोध
तिहेरी तलाकमुळे मुस्लिम कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत करताना ते म्हणाले, तिहेरी तलाकवरील कायदा आमच्या मुस्लिम भगिनींना मदत करत आहे. माझ्या मुस्लिम माता-भगिनींनो हे समजून घ्या की, तिहेरी तलाकचा केवळ तुमच्या जीवाला धोका न्हवता तर माझ्या मुस्लिम मुलींच्या डोक्यावर टांगती तलवार होती.मोदींनी तुमचे रक्षण केले नाही तर मोदींनी प्रत्येक मुस्लिम कुटुंबांचे रक्षण केले आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, मुस्लिम कुटुंबांतील वडिलांना एक भीती असायची अन त्यांना एक प्रश्न पडायचा की, मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला दोन तीन मुले होतील, अन त्यानंतर तिचा पती तिहेरी तलाक करून तिला घरी पाठवेल, मग मी त्या मुलीचा सांभाळ कसा करू?.मुलीच्या भावाला आणि आईला देखील हाच प्रश्न पडत असेल.संपूर्ण परिवार तिहेरी तलाकच्या नावाखाली टांगत्या तलवारीखाली जगत होते.मोदींनी केवळ मुस्लिम भगिनींचेच नव्हे तर मुस्लिम कुटुंबांचे प्राणही वाचवले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.