भारतीय विश्वविजेत्या शिलेदारांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

खेळाडूंशी केली दीड तास चर्चा

भारतीय विश्वविजेत्या शिलेदारांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ गुरुवार, ४ जुलै रोजी भारतात दाखल झाला आहे. नवी दिल्लीत विमानाने भारतीय संघ दाखल होताच विमानतळावर आणि नंतर हॉटेलमध्ये संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती.

बार्बाडोसमध्ये आलेल्या ‘बेरिल’ चक्रीवादळामुळे भारतीय संघाला भारतात पोहचायला विलंब झाला. अखेर गुरुवारी पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय संघ दाखल झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं. भारतीय संघ तिथून हॉटेलमध्ये गेली. यानंतर भारतीय संघ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाली होती. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी संघाचे स्वागत करत त्यांच्याशी गपों देखील मारल्या.

खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ लोक कल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण भारतीय संघ हजार होता. नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे स्वागत करत त्यांचे त्यांच्या यशाबद्दल भरभरुन कौतुकही केलं. जवळपास दीड तास मोदींनी विश्व विजेत्या खेळाडूंशी चर्चा केली. भारतीय संघाचे सर्व खेळाडू नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पोहचले होते. ही चॅम्पियन लिहिलेली जर्सी खास बनवून घेण्यात आली आहे.

भारतीय संघ आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला. तसेच विश्वचषकातील काही आठवणी खेळाडूंनी नरेंद्र मोदींना सांगितल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले.

हे ही वाचा:

भोले बाबा म्हणतात हाथरसमध्ये समाजकंटकांमुळे झाली चेंगराचेंगरी

चाहत्यांची प्रतीक्षा संपली; अखेर टी- २० वर्ल्ड कपसह भारतीय संघ मायदेशी परतला

हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात विहिंपकडून निदर्शने

भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन झाल्यानंतर सर्व खेळाडू मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मुंबईत विजयी रॅली निघणार असून वानखेडे स्टेडियमवर भव्य सोहळा देखील पार पडणार आहे. यासाठी मुंबईतील प्रशासन सज्ज झाले असून चाहत्यांमध्येही मोठा उत्साह आहे.

Exit mobile version