मोदींचे स्केच काढणाऱ्या चिमुकलीला लिहिलं पत्र

१० वर्षांच्या मुलीला दिले होते पत्र लिहिण्याचे आश्वासन

मोदींचे स्केच काढणाऱ्या चिमुकलीला लिहिलं पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्तीसगडमधील कांकेरमध्ये २ नोव्हेंबर रोजी निवडणूक रॅलीसाठी दाखलं झाले होते. यावेळी एका १० वर्षांच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्केच आणले होते. गर्दीत ही मुलगी स्केच घेऊन उभी होती. गर्दीत उभ्या असलेल्या या लहान मुलीला त्यांनी पाहिले. त्यानंतर पंतप्रधानांनी तिला ‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो. याच्यावर तू तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन,’ असे आश्वासन दिले होते. हेच आश्वासन नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे.

कांकेरमध्ये राहणारे दिनेश ठाकूर हे त्यांची १० वर्षांची मुलगी आकांक्षा ठाकूर हिला घेऊन कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी तिने आणलेले स्केच पाहिल्यानंतर नरेंद्र मोदींनी त्याचे कौतुक केले आणि त्यांना नक्कीच पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आकांक्षा ठाकूरला नरेंद्र मोदींनी आठवणीने पत्र लिहिले आहे.

हे ही वाचा.. 

गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य

भूपेश बघेल सरकारने निवडणुकीसाठी वापरला हवालाचा पैसा

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर; संघात प्रसिद्ध कृष्णाची लागली वर्णी

पाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षाला लिहीलेल्या पत्रात तिला आशीर्वाद दिले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लिहीलं आहे की, “प्रिय आकांक्षा, शुभेच्छा आणि आशीर्वाद. कांकेर कार्यक्रमात तू माझ्यासाठी आणलेले स्केच माझ्यापर्यंत पोहोचले आहे. या प्रेमळ अभिव्यक्तीबद्दल खूप खूप आभार. भारताच्या मुली या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. तुम्हा सर्वांकडून मिळालेले हे प्रेम आणि आपुलकी हीच देशसेवेच्या कामातील माझी शक्ती आहे. आपल्या मुलींसाठी एक निरोगी, सुरक्षित आणि सुसज्ज राष्ट्र निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. छत्तीसगडच्या लोकांकडून मला नेहमीच खूप प्रेम मिळाले आहे. देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत राज्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. पुढची २५ वर्षे तुमच्या सारख्या तरुण मित्रांसाठी आणि देशासाठी महत्त्वाची असणार आहेत. या वर्षांत आपली तरुण पिढी, विशेषत: तुमच्यासारख्या मुली त्यांची स्वप्ने पूर्ण करतील आणि देशाच्या भविष्याला नवी दिशा देतील. पीएम मोदींनी लिहिले की, तु खूप अभ्यास कर, पुढे जा आणि तुमच्या यशाने तुमच्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला गौरव मिळवून द्या. मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”

Exit mobile version