पंतप्रधान मोदी ठरले ‘इंडिया टुडे’चे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’

पंतप्रधान मोदी ठरले ‘इंडिया टुडे’चे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया टुडे’चे यंदाचे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर २०२३’ठरले आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाने केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पानांवरही मथळ्यांमध्ये सातत्याने स्थान मिळवल्याने त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या गौरवाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. मात्र या वर्षी अन्यजणही न्यूजमेकर होते, याची आठवण मोदी यांनी करून दिली.

‘इंडिया टुडे’शी केलेल्या खास बातचीतमध्ये पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी, कलाकार, ऍथलीट आणि देशाचे नागरिक हे यावर्षीचे ‘न्यूजमेकर’ होते असे सांगितले. ‘माझ्यासाठी अनेक जण या वर्षीचे न्यूजमेकर आहेत. विक्रमी शेतीउत्पन्न करणारे आणि जागतिकस्तरावर भरडधान्यक्रांती आणणारे शेतकरी; देशभरात जी२० परिषद यशस्वी करणारे आपल्या देशाचे नागरिक; आपल्या कौशल्याने यशस्वी मार्गक्रमणा करणारे विश्वकर्मा आणि आशियाई गेम्स, आशियाई पॅरा गेम्स आणि अन्य स्पर्धांमधून गौरवास्पद कामगिरी करणारे ऍथलीट हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ‘न्यूजमेकर’ आहेत,’ असे मोदी म्हणाले. देशातील तरुणांनी स्टार्ट अप्सच्या माध्यमातून आणि महिला वर्गाने विविध क्षेत्रांत योगदान देऊन ‘नया भारत’ला योगदान दिल्याने तेही आपल्यासाठी न्यूजमेकर असल्याचे मोदी यांनी आवर्जून सांगितले.

हे ही वाचा:

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!

रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमासच्या युद्धाची छाया, करोनासाथीचे पडसाद आणि जागतिक आर्थिक मंदी असूनही भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांत उंची गाठली आणि सर्व जगालाच आशेचा सूर दाखवला. पंतप्रधान मोदी आणि संसदेने ३३ टक्के महिला आरक्षणाचे विधेयकही सप्टेंबर महिन्यात संमत केले. तसेच, डिसेंबरमध्ये ब्रिटिशकालीन फौजदारी गुन्हे बदलून त्याजागी सध्याच्या काळाला सुसंगत असे कायदे बनवले. तसेच, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय या डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवला. भारताची अर्थव्यवस्थाही वेगाने घोडदौड करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे यंदाचे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ ठरले आहेत.

Exit mobile version