पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. यासोबतचं पुणे आणि पिंपरी- चिंचवड मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारादरम्यान वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मेट्रोसेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी बटन दाबून पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेचे लोकार्पण केले. यावेळी प्रधान मंत्री आवास योजनेचे उद्घाटनही नरेंद्र मोदी यांनी केले. यानंतर पुणे मेट्रोचा गरवारे कॉलेज ते रुबी हॉल, आणि सिविल कोर्ट ते फुगेवाडी हे दोन मार्ग लोकांच्या सेवेत आले आहेत.
२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात वेगाने मेट्रोची कामे करण्यात आली. पुण्यातील मेट्रोद्वारे शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार आहे. यामुळे आता पुणेकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार होणार आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत
पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; विरोधकांना धडकी
काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती
जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती
असे असतील मेट्रो प्रवासाचे दर
- वनाझ ते रुबी हॉल : २५ रुपये
- पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : ३० रुपये
- वनाझ ते पिंपरी-चिंचवड : ३५ रुपये
- रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : ३० रुपये
- वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान / पीएमसी : २० रुपये
- वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन : २५ रुपये
- रुबी हॉल ते शिवाजीनगर : १५ रुपये
- रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : २० रुपये
- पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : ३० रुपये