आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे अभिनंदन

आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून इस्रोचे अभिनंदन

भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल 1 ही शनिवार, २ सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली आहे. यानंतर इस्रोवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना भारताच्या पहिल्या सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, “चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा आपला अंतराळातील प्रवास सुरु केला आहे. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आमचे अथक प्रयत्न हे सुरुच राहतील. सूर्य मोहीम आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्वीट करत इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. या अंतराळ मोहिमेतून एका नव्या संशोधनपर्वाचा प्रारंभ होणार आहे आणि त्यावर आपल्या भारत देशाची मोहोर उमटणार आहे. आदित्य एल वन या यानासोबतची उपकरणे अवकाशातील सौरवादळे व त्यांच्या अवकाशातील हवामानावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास करणार आहेत. या मोहिमेमुळे, सूर्याचा वेध घेणाऱ्या देशांच्या मालिकेत भारताचे नाव मोठ्या सन्मानाने समाविष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चांद्रयानाप्रमाणेच भारताची ही सौरयान मोहीम यशस्वी ठरेल आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचा झेंडा दिमाखाने फडकत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

ओ मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्र पेटवू नका! मराठा समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही?

आदित्य एल1 सूर्याकडे झेपावले!

धक्कादायक! राजस्थानमध्ये विवाहितेची पती आणि सासरच्यांकडून नग्न धिंड

आरोग्य विभागातील भरतीप्रक्रिया पारदर्शक हवी

सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर संपूर्ण भारतात जल्लोष करण्यात आला. अवकाश केंद्रात मोठ्या प्रमाणात लोकांची देखील गर्दी जमली होती. संपूर्ण देशभरातून इस्रोच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे.

Exit mobile version