‘आगीत पुस्तके जळू शकतात, परंतु ज्ञान नाही’, पंतप्रधान मोदी!

नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन!

‘आगीत पुस्तके जळू शकतात, परंतु ज्ञान नाही’, पंतप्रधान मोदी!

बिहारमधील राजगीर येथील ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं आज ( १९ जून) पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुरातन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांनाही भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी बोधी वर्षाचे रोपण केले. यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसात मला नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. भारताच्या विकास यात्रेच्या शुभ संकेतमध्ये मी याला पाहतो. ‘नालंदा हे केवळ एक नाव नाही तर नालंदा एक ओळख आहे’. नालंदा एक सन्मान, मूल्य, मंत्र, गौरव आणि गाथा आहे. ते पुढे म्हणाले, नालंदा हे एक असे सत्य आहे जे स्पष्टपणे सांगते की, ‘आगीच्या ज्वाळांमध्ये भलेही पुस्तके जाळून जातील, परंतु आगीच्या ज्वाला ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत’.

ते पुढे म्हणाले, हे विद्यापीठ केवळ भारताच्या इतिहासाशी संबंधित नाही तर ते आशिया खंडाचा एक भाग आहे. विद्यापीठाच्या पुनर्बांधणीत आमचे सहकारी देशही सहभागी झाले असून त्यांचे सर्वांचे अभिनंदन. या सोहळ्याला “वसुधैव कुटुंबकम”चा आत्मा असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. नालंदा येथे २० हून अधिक देशांतील विद्यार्थी शिकत असल्याचे त्यांनी सांगितले. या उद्घाटन सोहळ्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया उपस्थित होते.

दरम्यान, बिहारमधील प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांना संयुक्त राष्ट्रांनी वारसा स्थळ म्हणून २०१६ मध्ये घोषित केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये या विद्यापीठाच्या बांधकामास सुरुवात झाली. नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन अवशेषांजवळच नवीन परिसर बांधण्यात आला आहे. या नवीन कॅम्पसची स्थापना नालंदा विद्यापीठ कायदा, २०१० द्वारे करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राज्यातील प्रत्येक तुरुंगातून तयार होणार बुद्धिबळपटू!

गुलामीचा नवा चेहरा म्हणजे ‘नाना पटोले’

केजारीवालांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलै पर्यंत वाढ

राम मंदिरात तैनात असलेल्या जवानाचा संशयास्पद गोळी लागून मृत्यू!

नव्या कॅम्पसची वैशिष्ट्ये
नवीन बांधण्यात आलेल्या कॅम्पसमध्ये दोन शैक्षणिक विभाग आहेत, ज्यात ४० वर्ग आहेत. येथे एकूण बसण्याची १९०० मुलांची बसण्याची व्यवस्था आहे. विद्यापीठात दोन सभागृहे आहेत ज्याची प्रत्येकाची आसन क्षमता ३०० इतकी आहे. तसेच यामध्ये सुमारे ५५० लोकांची क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे. यासह सुमारे २००० लोकांची आसनक्षमता असलेले आंतरराष्ट्रीय केंद्र आणि अम्पफी थियेटर देखील बांधण्यात आले आहे. फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासारख्या अनेक अतिरिक्त सुविधा आहेत.

दरम्यान, नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांचे मोठं शैक्षणिक केंद्र होत. सर्वात जुने विद्यापीठ म्हणूनही याची ओळख आहे. इसवीसन ४२७ मध्ये सम्राट कुमार गुप्ता यांनी याची स्थापना केली होती. १३ व्या शतकात म्हणजे ८०० वर्षांहून अधिक काळ विद्यापीठ येथे कार्यरत राहिले. प्राचीन आणि मध्ययुगीन मगध काळात नालंदा हे प्रसिद्ध बौद्ध महाविहार म्हणजेच महान मठ होते. हे जगातील बौद्ध धर्माचे सर्वात मोठे शिक्षण केंद्र होते.

नालंदा विद्यापीठात सुमारे १० हजार विद्यार्थी शिकत असत, ज्यांच्यासाठी १५०० शिक्षक असायचे. बहुतेक विद्यार्थी हे चीन, कोरिया, जपान, भूतान यांसारख्या आशियाई देशांतून आलेले बौद्ध भिक्खू होते. या विद्यार्थ्यांनी वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, गणित आणि बौद्ध तत्त्वांचा अभ्यास केला.आधुनिक जगाला १९ व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठाची ओळख निर्माण झाली. नालंदा विद्यापीठावर अनेकदा हल्ले झाले होते. परंतु ते टिकून राहील. मात्र, १२ व्या शतकामध्ये बख्तियार खिलजीने विद्यापीठावर हल्ला करून आग लावली. नालंदा युनिव्हर्सिटीचा कॅम्पस इतका मोठा होता की हल्लेखोरांनी आग लावल्यानंतर तीन महिने कॅम्पस जळत राहिल्याचे सांगितले जाते.

Exit mobile version