समृद्धी महामार्गावरील अपघातावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

मृतकांच्या वारसांना मदत जाहीर

समृद्धी महामार्गावरील अपघातावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे मध्यरात्री झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा होपपळून मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, राज्य सराकारने देखील मृतकांच्या वारसांना ५ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

यासंदर्भातील ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राच्या बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघाताचे खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. तसेच अपघातातील जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपदा फंडातून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील,” असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.

हे ही वाचा:

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी ड्रायव्हर, क्लिनरला पोलिसांनी घेतले ताब्यात

नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून १० तास चौकशी

ईडीचं मुंबई महापालिकेला पत्र; करोना काळातील खर्चांचे तपशील मागविले

या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण या घटनेत सुखरुप बचावले आहेत. दरम्यान या मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version