महामानवाला पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून अभिवादन

महामानवाला पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून अभिवादन

आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटर वरून अभिवादन केले आहे.

मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्त शत शत नमन. समाजातील वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा त्यांचा लढा प्रत्येक पीढीसाठी उदाहरण बनून प्रेरणा देत राहिल.

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. त्यांनी न्यायपूर्ण समाज बनविण्यासाठी आंबेडकरांनी केलेला संघर्ष आपण आपल्या जीवनात आचरला पाहिजे असा संदेश त्यांच्या ट्वीटमधून दिला आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी मेंदू तपासून घ्यावा

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना सर्व घटकांचा विचार केलेला नाही

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

कनफ्युजन ही कनफ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या ट्वीटमधून बाबासाहेब आंबेडकरांना नमन केले आहे. यावेळी त्यांनी बाबासाहेबांचे विराट जीवन आणि विचार आमची प्रेरणा आहे असे देखील म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत अमूल्य योगदान राहिले आहे. त्याबरोबरच समाजातील वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी देखील त्यांनी आवाज उठवलेला होता. त्यामुळे आज देशभरातून विविध नेत्यांतर्फे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले जात आहे.

Exit mobile version