पीएम केअर्समधून प्राणवायू संचांचा पुरवठा

पीएम केअर्समधून प्राणवायू संचांचा पुरवठा

देशात सध्या कोविडने हाहाकार माजला आहे. त्यामुळे देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या वाढत्या कोविडमुळे ऑक्सिजनच्या निर्माण झालेल्या पुरवठ्याचा सामना करण्यासाठी थेट पीएम केअर्स फंड मधून १ लाख पीओसी खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

कोविड रुग्णांना काही वेळेस प्राणवायू बाहेरून देण्याची गरज पडते. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येबरोबर देशातील वैद्यकीय प्राणवायूच्या मागणीत वाढ झाली आहे. भारत सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करत आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (पीओसी) मंजूर केले आहेत. त्याबरोबरच हे पीओसी ज्या राज्यांत सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांसाठी खरेदी करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम

महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण

‘या’ गावात झाले पंचेचाळीस वर्षावरील सर्वांचे १००% लसीकरण

आता गोव्यातही लॉकडाऊन

याबरोबरच यापूर्वी मंजूर केलेल्या ७१३ पीएसए सोबतच ५०० नव्या पीएसएच्या खरेदीला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे द्रवरूप वैद्यकिय प्राणवायूचा पुरवठा सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

भारताच्या या कठिण परिस्थितीत जगातील अनेक देश मदतीला धावले आहेत. जगातील वेगवेगळ्या ठिकाणांहून द्रवरूप प्राणवायू वाहून नेण्याचे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारताला मदत स्वरूपात पुरवण्यात आले आहेत. त्याबरोबरच वहन करता येण्यायोग्य ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट देखील आणण्यात आले आहेत.

Exit mobile version