केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी काही महत्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली आहे. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत येथील पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
पुण्यातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्याचा मेगा प्लॅन नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. परिषदेत नितीन गडकरी म्हणाले, येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तेथील पूल तोडण्यात येणार आहे. पूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नियोजन करणार आहेत. वेळेत काम पूर्ण झाल्यास नव्या पुलाचे उद्घाटन लवकरच केले जाणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत. पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरु करण्याचा विचार सुरु असल्याचेही गडकरी यांनी सांगितली आहे.
पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्त्याच्या डिझाइनचे काम चालू आहे. सोबतच तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचंही काम चालू असून त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहने वळवता येऊ शकतात. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचे काम सुरू असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत. तसेच नाशिक फाटा इथे सुद्धा सहा पदरी दोन मजली उड्डाणपूल आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली रस्ता करण्याचा विचार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
‘भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत’
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘विविधतेत एकता’ उत्सव
महाराष्ट्र काँग्रेसमधील जी-२२ मुळे खोळंबला मंत्रिमंडळाचा विस्तार
मदरशातून देशविरोधी कृत्य झाले तर याद राखा
पुढे गडकरी म्हणाले, चाकण एमआयडीसीपासून २७ किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे १८० हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. पुण्यातील मेगा प्लॅन बद्दल बोलताना गडकरी म्हणाले, बावधन ते सातारा रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे. तसेच कोथरूड वारजे ते सातारा रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे.