भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’

भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसोबत ‘चाय पे चर्चा’ केली आहे. शनिवार १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या मार्फत टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठी हाय टी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती भवन येथील कल्चरल सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे देखील उपस्थित होते.

यावेळी खेळाडूंशी संवाद साधताना राष्ट्रपतींनी या खेळाडूंच्या ऑलिम्पिक कामगिरीचे कौतुक केले. तर या कामगिरीचा भारताला अभिमान आहे असे राष्ट्रपती म्हणाले. आजवरच्या भारताच्या ऑलिम्पिकमधील सहभागाच्या इतिहासात सर्वाधिक पदके भारताने यावर्षी कमावली आहेत. तर या कामगिरीमुळे युवकांना विविध खेळांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन मिळेल, तर पालकांमध्येही खेळांप्रति सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

हे ही वाचा:

बडोद्यातील मंदिरांना लाऊड स्पीकर वाटप

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

भारतातील चार पाणथळ ठिकाणांचा रामसर यादीत समावेश

फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’

टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताची कामगिरी ही फक्त कामगिरी या दृष्टिकोनातूनच नव्हे तर त्याच्याशी संबंधित शक्यतांच्या दृष्टिकोनातूनही महत्वपुर्ण आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. बरेचसे खेळाडू त्यांच्या क्रीडा कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी बजावलेल्या कामगिरीतील त्यांचा उत्साह आणि कौशल्य यावरून येत्या काळात भारत जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करेल असे दिसते. राष्ट्रपतींनी संपूर्ण भारतीय चमूचे, त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले. खेळाडूंच्या तयारीमध्ये त्यांचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, कुटुंबीय आणि त्यांच्या शुभचिंतकांनी बजावलेल्या भूमिकांचीही राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

Exit mobile version