‘लताजींची दैवी वाणी कायमची शांत झाली, पण त्यांचे सूर अमर राहतील, गुंजत राहतील’

‘लताजींची दैवी वाणी कायमची शांत झाली, पण त्यांचे सूर अमर राहतील, गुंजत राहतील’

भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लता दीदींच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातून, देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

जगभरातील लाखो लोकांसाठी जसे लताजी यांच्या निधनाचे वृत्त हृदयद्रावक आहे, तसेच माझ्यासाठीही असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. भारताचे सार आणि सौंदर्य प्रस्तुत करणार्‍या त्यांच्या गाण्यांमध्ये अनेकांना त्यांच्या आंतरिक भावनांची अभिव्यक्ती सापडली. भारतरत्न, लताजींचे कर्तृत्व अतुलनीय राहील, असे राष्ट्रपती म्हणाले.

असा कलाकार शाताकांमध्ये एकदाच जन्माला येतो. त्यांची दैवी वाणी कायमची शांत झाली पण त्यांचे सूर अमर राहतील, चिरंतन गुंजत राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि सर्व चाहत्यांना माझ्या संवेदना, असे ट्विटमध्ये राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘लतादीदींच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे’

भारताने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरत रचला इतिहास!

‘लता दीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती’

स्वर कोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

लता मंगेशकर यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. लता मंगेशकर यांना गान कोकिळा म्हणूनही ओळखले जात. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. तर २० पेक्षा अधिक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. प्रामुख्याने त्या मराठी भाषेतील गाणी गायल्या आहेत.

Exit mobile version