भारतीय सैन्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या अपघाती निधनाने सारा देश शोकाकुल झाला आहे. त्यांच्या निधनाबद्दल साऱ्या देशातून दुःख व्यक्त केले जात असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील लाखो नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी झालो आहे. ज्यामध्ये आम्ही जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी अत्यंत तन्मयतेने भारताची सेवा केली. माझे सद्भावना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत.
हे ही वाचा:
मोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक
पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार
जनरल बिपिन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. ते एक सच्चे देशभक्त होते. त्यांनी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन अतिशय वेगळा होता. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती.
भारताचे पहिले CDS म्हणून, जनरल रावत यांनी संरक्षण सुधारणांसह आपल्या सशस्त्र दलांशी संबंधित विविध पैलूंवर काम केले. सैन्यात सेवेचा समृद्ध अनुभव त्यांनी सोबत आणला. त्यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही.
तर राष्ट्रपाती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की, “जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका जी यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा अपवादात्मक शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.
हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून घेणे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला श्रद्धांजली अर्पण करण्यात सर्व भारतीय जनतेसोबतय मी देखील सामील आहे. शोकाकुल कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “देशासाठी हा एक अतिशय दु:खद दिवस आहे कारण आपण आपले CDS, जनरल बिपिन रावतजी यांना एका अत्यंत दुःखद अपघातात गमावले आहे. ते शूर सैनिकांपैकी एक होते, ज्यांनी अत्यंत निष्ठेने मातृभूमीची सेवा केली. त्यांचे अनुकरणीय योगदान आणि वचनबद्धता शब्दात मांडता येणार नाही. मला खूप वेदना होत आहेत.