श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे सोमवारी (६ डिसेंबर) निधन झाले. वयाच्या ६५व्या वर्षी यकृताच्या कर्करोग या दुर्धर आजारामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील दोन आठवडयांपासून त्यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.

मागील ५० ते ५५ वर्षे अशोक गोडसे हे ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. सुवर्णयुग सहकारी बँकेच्या संचालक पदाचा कारभारही त्यांनी सांभाळला होता. गोडसे हे सामाजिक क्षेत्रात कायम सक्रिय असत. त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून ‘मानवतेचे महामंदिर’ ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबवले. गरजू तसेच गरीब लोकांना मोफत व कमी दारात उपचार त्यांनी मिळवून दिले होते. ससून सर्वोपचार रुग्णालायसोबत एकत्रित काम करत दुर्धर आजारांसह महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना राबवल्या होत्या.

हे ही वाचा:

२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित

लवकरच स्वदेशी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान

‘ओबीसी आरक्षणाचा अध्यदेश गृहीत धरता येणार नाही’! ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

आंग सान स्यू की यांना चार वर्षांचा तुरुंगवास

सन २०१० मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते. सामाजिक क्षेत्रात अशोक गोडसे यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सामाजिक क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Exit mobile version