राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डोळ्यावर झाली शस्त्रक्रिया, काय झाले होते?

लष्कराच्या रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डोळ्यावर झाली शस्त्रक्रिया, काय झाले होते?

राष्ट्रपती द्रौपदी यांच्या यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ही शस्त्रक्रिया रविवारी करण्यात आली. राष्ट्रपती  दिल्लीतील लष्करी रुग्णालयात राष्ट्रपती यांच्या डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

लष्कराच्या रिसर्च आणि रेफरल रुग्णालयामध्ये राष्ट्रपती द्रौपदी यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती आज सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीतल्या कॅन्ट विभागातील रिसर्च अँड रेफरल लष्करी रुग्णालयात भरती झाल्या. राष्ट्रपतींच्या डाव्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदूचा त्रास होता

हे ही वाचा

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण

ही शस्त्रक्रिया ब्रिगेडियर एस के मिश्रा आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आली. सकाळी ११. ३० वाजता ही शस्त्रक्रिया झाली. त्याच्यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. राष्ट्रपतींना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे रुग्णालयाने म्हटलं आहे. चौसष्ट वर्षीय द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै २०२२ रोजी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

Exit mobile version