राष्ट्रपती मुर्मू, मोहन भागवत, अमित शाह, सचिन तेंडूलकर यांना मिळाले निमंत्रण

२२ जानेवारीला आयोध्येत उपस्थित राहणार  

राष्ट्रपती मुर्मू, मोहन भागवत, अमित शाह, सचिन तेंडूलकर यांना मिळाले निमंत्रण

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामलला प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भारतरत्न सचिन तेंडूलकर यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली.

हेही वाचा..

घरची माणसं टिकेनात; चालले ‘भारत जोडो’ला!

दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही

नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी काम करणार

चिनी ड्रॅगनच्या वेटोळ्यात मालदीवचे वाटोळे!

निमंत्रण मिळताच राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, या सोहळ्याचे निमंत्रण मिळायचा अत्यंत आनंद झाला. लवकरच आयोध्येला जाण्याबद्दल वेळ निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रा.स्व. संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्री राम लाल. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार आणि मंदिर समितीचे अध्यक्ष श्री नृपेंद्र मिश्रा उपस्थित होते. भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनाही निमंत्रण देण्यात आले. कप्तान रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. प्रभू श्री रामाची भूमिका करणाऱ्या आणि तमाम भारतीयांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेते अरुण गोविल यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही दोन दिवसापूर्वीच निमंत्रण देण्यात आले आहे. दिल्लीमध्ये त्यांना हे निमंत्रण देण्यात आले.

 

Exit mobile version