राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार

राष्ट्रपती व्यक्त करणार शोकसंदेश

राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार

ब्रिटनच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्यावर दोन दिवसांनी शासकीय अंत्यसंस्कार होणार आहेत. एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भारतातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जाणार आहेत. भारत सरकाराच्यावतीने मुर्मू शोक व्यक्त करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. भारतात त्यांच्या निधनाबद्दल रविवारी राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता. या दिवशी राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ भारतातील राष्ट्रध्वज अर्धवट राहिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. सोबतच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी १२ सप्टेंबर रोजी ब्रिटिश उच्चायुक्ताला भेट दिली आणि भारताच्या वतीने शोक व्यक्त केला होता.

राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्यावर शाही परंपरेनुसार १९ सेप्टेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १७ ते १९ सप्टेंबर रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी लंडनला जाणार आहेत. राणी दुसऱ्या एलिझाबेथ वेस्टमिन्स्टर ऍबे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी राणी एलिझाबेथ यांना दफन केले जाणार आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात ‘या’ सेवा मिळणार मोफत

गाेव्यामध्ये काॅंग्रेसचे आठ आमदार ‘पदयात्रा’ करत भाजपात

आमदार बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी जगातून पाचशेहुन अधिक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जगातील मान्यवर, राष्ट्रप्रमुख, सरकारी व्यक्ती तसेच परदेशी मान्यवरांसह उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version