राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी केले अभिनंदन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मंगळवारी (६ऑगस्ट ) फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ ने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांमधील संबंधांची प्रशंसा केली आणि सांगितले की, भारत एक मजबूत, लवचिक आणि अधिक समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी फिजीसोबत भागीदारी करण्यास तयार आहे.

फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने राष्टरापतींना सन्मानित केल्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवर दिली. “फिजीचे राष्ट्रपती रातू विल्यम मावाली काटोनिवेरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ पुरस्कार प्रदान केला ,” असे राष्ट्रपती कार्यालयाने पोस्टमध्ये म्हटले.

हा फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. फिजीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांनी या सन्मानाचे वर्णन भारत आणि फिजी यांच्यातील “मैत्रीच्या खोल बंधांचे प्रतिबिंब” म्हणून केले आहे. या द्वीपसमूह राष्ट्राला भारतीय राष्ट्रप्रमुखाची ही पहिलीच भेट आहे.

हे ही वाचा:

न्यूयॉर्कमधील बांगलादेशच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला

धर्मांतर करणाऱ्या ख्रिश्चन पाद्रीला रंगेहात पकडले !

‘बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की, भारतीयांना बाहेर काढण्याची गरज आहे’

बांगलादेशमधील हिंसाचारामागे आयएसआय पुरस्कृत इस्लामी छात्र शिबीर संघटना?

राष्ट्रपतींना मिळालेल्या सन्मानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटरवर लिहिले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ मिळणे ही आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. राष्ट्रपतींचे हार्दिक अभिनंदन आणि देशवासियांचे खूप खूप अभिनंदन.

Exit mobile version