राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ पुरस्काराने सन्मानित !

राष्ट्रपती जोस रामोस-होर्टा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ‘ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ पुरस्काराने सन्मानित !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर-लेस्टे या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ने सन्मानित करण्यात आले आहे. तिमोर-लेस्टेचे राष्ट्रपती जोस रामोस-होर्टा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सार्वजनिक सेवा आणि शिक्षण, समाजकल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

तिमोर-लेस्टे हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे. या देशाचे राष्ट्रपती जोस रामोस-होर्टा आणि पंतप्रधान जोस अलेक्झांडर ” क्साना ” गुस्माओ हे आहेत. या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, हा सन्मान भारत आणि तिमोर-लेस्टे यांच्यातील मैत्रीच्या संबंधांचे प्रतिबिंब आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी या फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टेच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तिमोर लेस्टे हा दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे.
राष्ट्रपतींच्या सहा दिवसांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा उद्देश भारताचे ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण पुढे नेणे हा आहे.

हे ही वाचा..

बीडमध्ये भीषण रेल्वे अपघात; मेंढपाळासह २२ मेंढ्या, २ जनावरांचा जागीच मृत्यू !

अमेरिकेनेच आपल्याला सत्तेवरून हटवले

मध्य प्रदेशातील गुना येथे विमान अपघात, दोन पायलट जखमी !

अखंड भारताच्या फाळणीचा जाणून घ्या खरा इतिहास, स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तकांवर २० टक्क्यांची सवलत !

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मंगळवारी (६ऑगस्ट ) फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ ने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती मुर्मू यांनी दोन्ही देशांमधील संबंधांची प्रशंसा केली आणि सांगितले की, भारत एक मजबूत, लवचिक आणि अधिक समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी फिजीसोबत भागीदारी करण्यास तयार आहे. भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच फिजी भेट होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटलेले पुरस्कार ..
तिमोर-लेस्टे देशाचा : “ग्रँड-कॉलर ऑफ द ऑर्डर” ऑफ तिमोर-लेस्टे (१० ऑगस्ट २०२४)
फिजी देशाचा : “द कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी” (६ ऑगस्ट २०२४ )
सुरीनाम देशाचा : “ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द यलो स्टार” (६ जून २०२३)

Exit mobile version