नेहरू मेमोरियल म्युझियम ऍन्ड लायब्ररीच्या नामांतराला राष्ट्रपतींकडून मंजुरी

गॅझेट नोटिफिकेशन केले जारी

नेहरू मेमोरियल म्युझियम ऍन्ड लायब्ररीच्या नामांतराला राष्ट्रपतींकडून मंजुरी

केंद्र सरकारने नेहरू मेमोरियल म्युझियम ऍन्ड लायब्ररीच्या नामांतराचा प्रस्ताव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. आता हे म्युझियम प्राईम मिनिस्टर म्युझियम म्हणून ओळखले जाणार आहे. याबाबत केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये सूचना जारी करण्यात आली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘एनएमएमएल’च्या विशेष बैठकीमध्ये नाव बदलाचा निर्णय घेण्यात आला होता. राजनाथसिंह यांनी या संस्थेच्या नाव बदलाच्या प्रस्तावाचे मनापासून स्वागत केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवेदन सादर करण्यात आले होते. नव्या मेमोरियलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे देशाच्या विकासातील योगदान ठळकपणे मांडले जाणार असल्याचे यात सांगण्यात आले होते.

हे ही वाचा:

‘कलम ३७० हे १९५७मध्येच रद्द करायला हवे होते’

पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार

माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढवायला हव्यात!

लोकसहभाग वाढवून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान यशस्वी करा!

केंद्र सरकारच्या या नामांतर निर्णयावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी टीका केली होती. “सरकारने सूडवृत्ती आणि क्षुद्रपणा दाखवला,” असा आरोप त्यांनी केला होता. “नवे नाव हे राजकारणाच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला ते कळू शकणार नाही. त्यांचा दृष्टिकोन केवळ एका घराण्याचा वारसा जिवंत ठेवण्यापुरता सिमित आहे. देशाच्या इतर पंतप्रधानांच्या योगदानाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही,” अशी भूमिका भाजपाने मांडली होती.

Exit mobile version