‘डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील’

‘डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील’

अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची ४ जानेवारी रोजी पुण्यात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज ५ जानेवारीला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंधुताई यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे, कार्यामुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

नुकताच सिंधुताई यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. सिंधुताई यांच्या जाण्याने राष्ट्रपतींनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे जीवन हे धैर्य, समर्पण आणि सेवेची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी अनाथ, आदिवासी आणि उपेक्षित लोकांवर प्रेम केले. त्यांची सेवा केली. २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित त्यांनी धैर्याने स्वतःची कथा लिहिली,’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.

हे ही वाचा:

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन

मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!

चिन्यांना प्रत्युत्तर; भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात फडकावला तिरंगा

अनाथांचा आधार असलेली माय अशी ओळख असणारी सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांचा सांभाळ केला. आज सिंधुताई सपकाळ यांच्यावर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल या भागात त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील.

Exit mobile version