४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासाठी लगबग सुरू!

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासाठी लगबग सुरू!

देशासह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाच राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी तर शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अंदाज घेऊन आयुक्तांचा निर्णय हा अंतिम असणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी पालिका शिक्षण विभागाकडून आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका शाळांमधील जवळपास ७३ टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यावर प्रामुख्याने ८ वी ते १० वी म्हणजेच माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

हे ही वाचा:

पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनो, सीईटी परीक्षा पुन्हा होणार

टी-२० क्रिकेटचा लॉर्ड

पालिका कर्मचारीच मागत होता फेरीवाल्यांकडून १०-१० रुपये…वाचा!

मागण्या पूर्ण करा नाहीतर कामबंद; ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा पवित्रा!

शाळांमध्ये एका बाकावर एक विद्यार्थी, प्रवेशद्वारावर स्क्रीनिंग, हात धुण्यासाठी मुबलक पाणी अशा सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे होईल. विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांना मास्क वाटपही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका शिक्षण विभागाकडून पालकांच्या संमतीपत्राचा नमुना बनवून घेण्यात आला आहे. पालकांनी हे संमतीपत्र दिले तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढेही काही दिवस आपले ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवायचे आहे, त्यांना महानगरपालिका शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करता येणार असल्याचे राजू तडवी यांनी सांगितले.

‘शाळा सुरू होणार आहेत, हे शैक्षणिक दृष्ट्या उत्तम आहे. शाळांनी परिसराची स्वच्छता, सुरक्षित अंतर आणि शिक्षकांचे लसीकरण या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे,’ असे मत पालक मीनाक्षी कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. ‘शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांची जबाबदारी ही पालक आणि शाळा दोघांवर असणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत सुरक्षित वावर करावा या गोष्टी पालकांनी समजावून द्यायला हव्यात. शाळेत याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, असे पालक अभिषेक गव्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Exit mobile version