योगी सरकारकडून नोएडा विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरू

योगी सरकारकडून नोएडा विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुसऱ्या टप्प्यातील जेवर येथील विस्तारासाठी १,३६५ हेक्टर जमिन मंजूर केली आहे.

आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळाने ₹२,८९० कोटी रुपये जमिन संपादनासाठी मंजूर केले आहेत. हे पैसे या जमिनीवरील लोकांच्या पुनर्वसनासाठी वापरले जाणार आहेत.

हे ही वाचा:

ममतांचे दुखापतीनंतरचे अजब विधान, हिंदू देवतांबद्दल काय बोलल्या?…

कुबेरगिरी, अर्थात निसटलेल्या लंगोटीची नैतिकता

भारताच्या लोकशाहीची तुलना गडाफी, सद्दामशी करणे हा भारतीयांचा अपमान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुख्य सचिव एस पी गोयल यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी १३६५ हेक्टर जमिन मंजूर झाल्याचे सांगितले आहे.

जेवार विमानतळ योगी सरकारने डिसेंबर २०१७ मध्येच मंजूर केला आहे. याबाबत सामंजस्य करार यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा.लि या स्पेशल व्हेहिकल पर्पज कंपनीसोबत केला आहे. या कंपनीची स्थापना झुरिच इंटरनॅशनल एजी मार्फत ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२३ मध्ये चालू होणार आहे. मात्र, कोविड-१९मुळे याप्रकल्पाचे वेळापत्रक कोलमडले आहे आणि आता त्यात काही आवश्यक ते बदल केले जातील.

हा विमानतळ जेव्हा चालू होईल तेव्हा यावरून दरवर्षाला १२ मिलीयन लोकांची हाताळणी केली जाऊ शकेल. हा विमानतळ सुमारे ५००० हेक्टर वर पसरलेला असेल आणि यावर किमान आठ ते दहा धावपट्ट्या असतील.

Exit mobile version