या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

या कारणामुळे सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या भीषण अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाहोता. या अपघाताचे नेमके कारण काय यावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, आता या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.

तामिळनाडूमध्ये ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या अपघातावरील प्राथमिक अहवाल न्यायालयात (The Tri-Services Court) सादर करण्यात आला असून या चौकशीत तपास पथकाने हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. त्यावरून या अहवालात हेलिकॉप्टरच्या अपघाताला अचानक बदललेलं हवामान आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा ढगांमध्ये प्रवेश हे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला होता. इथल्या निलगिरीच्या डोंगराळ प्रदेशामध्ये त्यांचे  हेलिकॉप्टर कोसळले होते. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.

हे ही वाचा:

केंद्र म्हणते महाराष्ट्रात पुरेसा लससाठा आहे

टीम इंडियाला साडेसाती; तिसरी कसोटीही दक्षिण आफ्रिकेने सात विकेट्सनी जिंकली

आठवी पास पठ्ठ्याने ३० हजारांत बनवली फोर्ड कार

भारत बायोटेकच्या संस्थापकांनी तिरुमला देवस्थानला दिली ‘ही’ देणगी

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. तसेच रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातात वरुण सिंह हे अधिकारी बचावले होते. मात्र, ते गंभीर जखमी असल्याने नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version