गर्भवतींसाठीच्या बाईक अॅम्ब्युलेन्स खात आहेत धूळ

सरकारी कारभारामुळे बाईक धूळ खात पडल्या आहेत.

गर्भवतींसाठीच्या बाईक अॅम्ब्युलेन्स खात आहेत धूळ

सरकारी लाल फितीत

भारत देश स्वतंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र आदिवासी भागात अजूनही मूलभूत सुविधांचा पुरवठा पूर्णपणे होत नाहीये. त्यातच आदिवासी भागात गर्भवती महिलांची नेहमीच हेळसांड होत असते. या महिलांना वेळेत ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने बालकांसह मातेच्या मृत्यूत ही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दरम्यान महिलांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी रोटरी क्लब ने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या बाईक ऍम्ब्युलन्स धूळ खात पडल्याची माहिती लोकमतने दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये चारचाकी वाहनांना गावांमध्ये जाण्यास सक्षम रस्ता नसल्याने चार चाकी कोणतीही गाडी जात नाही. तेथे बाईक ऍम्ब्युलन्सचा वापर करून, गर्भवती महिलांना हॉस्पिटल मध्ये पोहोचवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. मात्र आता पर्यंत या बाईक ऍम्ब्युलन्सचा कोणत्याही गर्भवती महिलांसाठी उपयोग करण्यात आलेला नाही. यासाठी या ऍम्ब्युलन्स दिल्या गेल्या होत्या. शासनाच्या उदासीन कारभारामुळे व खराब रस्त्याचे कारण देऊन अजूनही रुग्णालयाच्या बाहेर बाईक ऍम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत.

हे ही वाचा:

झारखंडमध्ये गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

जेष्ठ नागरिकांचा ‘त्या’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार

पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गमभाग म्हणून ओळखला जाणारा मोखाडा, जव्हार तालुक्याची नोंद आहे. याच आदिवासी तालुक्यामधील अनेक गावात किंवा पाड्यात साधे रस्ते नसल्याने तिथं पर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुठलीही खाजगी वाहन तिथं पर्यंत पोहोचू शकत नाही. अनेक गाव किंवा पाड्यातील रुग्णांना दवाखान्यात भरती करण्यासाठी झोळी किंवा डोलीचा उपयोग केला जातो. यामध्ये गर्भवती महिलेची हेळसांड होऊन मृत्यू झाल्याचीही घटना घडली आहे.

 

Exit mobile version