रस्ते, शाळांपेक्षा सायकल ट्रॅक महत्त्वाचा!

रस्ते, शाळांपेक्षा सायकल ट्रॅक महत्त्वाचा!

कोरोनाच्या संकटकाळात उत्पन्न घटल्यामुळे शाळा व रस्त्यांच्या डागडुजीची कामे थांबविलेली असली तरी बांद्रा-माहीम किल्ला तसेच मलबार हिल पादचारी मार्ग आणि सायकलिंग ट्रॅकसाठी खर्च करण्यास प्राधान्य दिले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पालिकेचे उत्पन्न गेल्या दीड वर्षात चांगलेच घटले आहे. त्यामुळे पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या बांद्रा माहीम किल्ला या मार्गावर जो पादचाऱ्यांसाठी व सायकलिंग करणाऱ्यांसाठी ट्रॅक तयार करण्यात येत आहे, त्यासाठी १६८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तर मलबार हिल येथील पादचाऱ्यांच्या ट्रॅकसाठी १२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. रस्त्यांच्या डागडुजीचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार होते पण त्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी तब्बल १२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पालिकेच्या शाळांच्या डागडुजीसाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पण तोही प्रलंबित असल्यामुळे शाळांची स्थिती बिकट झाली आहे.

हे ही वाचा:

शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक

‘भारतात हिंदू तालिबानी आहेत’ मुनव्वर राणांची मुक्ताफळे

अफगाण फुटबॉलपटूचा ‘असा’ झाला मृत्यू

अबब! मुंबईत ४२ बोगस डॉक्टर्स

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, शाळांची सुधारणा आणि रस्त्यांची डागडुजी या अत्यावश्यक उपाययोजना करण्याच्या ऐवजी मुंबई महापालिकेचा वारेमाप पैसा सायकलिंग ट्रॅक, वॉकवे सारख्या अनावश्यक दुय्यम गरजांवर खर्च केला जात आहे. ज्याची जास्त टक्केवारी त्याचं पारडं भारी एव्हढा साधा हिशोब आहे.

Exit mobile version