माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रीती सुदान या १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुदान या १ ऑगस्टपासून युपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याअगोदर राजीनामा दिला होता. महिन्याच्या सुरुवातीला मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. त्यामुळे अध्यक्ष पदाची धुरा आता प्रीती सुदान यांच्याकडे देण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२४ पासून त्या कार्यभार स्वीकारतील आणि एप्रिल २०२५ पर्यंत त्या या पदावर राहतील. मनोज सोनी हे २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. १६ मे २०२३ रोजी त्यांची लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
1983 batch IAS officer and former Union Health Secretary Preeti Sudan will be the new UPSC Chairperson: Preeti Sudan confirms to ANI
(File photo) pic.twitter.com/FmyXZZ2U0m
— ANI (@ANI) July 31, 2024
कोण आहेत प्रीती सुदान?
प्रीती सुदान या आंध्र प्रदेश कॅडरच्या १९८३ बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै २०२० मध्ये संपला होता. त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाशिवाय संरक्षण मंत्रालयातही काम केले आहे. त्या आंध्र प्रदेशात वित्त, योजना, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आणि कृषी विभागाच्या प्रभारी होत्या. प्रीती सुदान यांनी जागतिक बँकेत सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
हे ही वाचा:
इराणमध्ये हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हनीयेह ठार
अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १४५ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू
अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद
प्रीती सुदान यांनी अर्थशास्त्रात M.Phil आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून सामाजिक धोरण आणि नियोजनामध्ये एमएससी केली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आणि ‘आयुष्मान भारत’ यासह अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सुदान यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.