पंतप्रधान मोदींकडून कोरोनाबाबत सावधगिरीचे निर्देश

आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान मोदींकडून कोरोनाबाबत सावधगिरीचे निर्देश

काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारी पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशातील करोनाची सद्य:स्थिती, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची सज्जता, लसीकरण मोहिमेची परिस्थिती, करोनाचे नवे विषाणू आणि त्याच्या परिणामांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने निवेदन जारी केले. त्यानुसार, शनिवारपासून परदेशातून आलेल्या दोन टक्के प्रवाशांची क्रमविरहित कोरोना चाचणी होणार आहे.

तसेच सध्या असलेल्या यंत्रणांमध्ये सुधारणा करा, अशी सूचनाही राज्यांना दिली आहे. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात, नववर्ष स्वागतावेळी गर्दीच्या ठिकाणी जाताना अधिक सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. करोनाबाबत सर्व आरोग्य यंत्रणा कायम सज्ज अवस्थेत असतील, याची काळजी घेण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.

हे ही वाचा : 

मुलगी बळी जाऊ नये म्हणून…

मोर्चा विराट की विरळ?

यूट्युब चॅनेल चालवत होते देशाविरुद्ध मोहिमा

वाढत्या कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था गडगडली आणि भारताला आली उभारी

दरम्यान, राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेतली आहे. राज्य सरकार योजत असलेल्या उपायांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली. राज्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तापमान तपासणी (थर्मल टेस्टिंग) केली जाईल, असे सावंत यांनी जाहीर केले. तसेच राज्यात ओमायक्रॉनच्या ‘बीएफ-७’ या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version