पंतप्रधानांकडून तामिळनाडूतील रामसेतूला पुष्पांजली अर्पण

पंतप्रधानांकडून तामिळनाडूतील रामसेतूला पुष्पांजली अर्पण

प्रभू श्रीरामाने लंकेला जाण्यासाठी ज्या ठिकाणी सेतू बांधला अशा तामिळनाडूच्या धनुषकोडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पित केली. अरीचल मुनई येथे त्यांनी राममंदिर उद्घाटनाच्या आधी त्यांच्या ११ दिवसांच्या विधीचा एक भाग म्हणून दर्शन घेऊन प्रार्थना केली. याशिवाय ते धनुषकोडी येथील श्री कोदंडराम स्वामी मंदिरात प्रार्थना करणार आहेत, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

तत्पूर्वी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिची येथील श्री रंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिली. पंतप्रधान मोदी शुक्रवारी तामिळनाडूच्या चेन्नईला आपल्या चाहत्यांच्या उपस्थितीत पोहोचले. त्यांनी चेन्नईमध्ये रोड शो केला.

 

Exit mobile version