प्रयागराजचे पोलीस महानिरीक्षक यांनी मशिदींवरचे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी प्रयागराज मधील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. अलाहबाद विद्यापीठाच्या कुलगुरु संगीता श्रीवास्तव यांच्या तक्रारी नंतर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कुलगुरू संगीता श्रीवास्तव यांनी पत्र लिहून केलेल्या तक्रारीत असे लिहीलं आहे की, “मी आपल्या लक्षात आणुन देऊ इच्छिते की रोज सकाळी ५.३० वाजता जवळच्या मशिदीतील मौलवींच्या अजानच्या आवाजामुळे माझी झोपमोड होते. नंतर कितीही प्रयत्न केला तरी झोप लागू शकत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा सामना करावा लागतो आणि कामाचे तास वाया जातात. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. परंतु ते आझान बिना-माईक सुद्धा अदा करू शकतात, ज्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष आणि सर्व समाजाचे लोक एकत्र राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र ते प्रत्यक्षात आणले पाहिजे.”
हे ही वाचा:
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह
अमेरिकेचे संरक्षणमंत्री भारतात
संगीता श्रीवास्तव यांच्या या तक्रारीनंतर प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिक्षक के.पी.सिंह यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत. “प्रशासनाने यासंबंधातील अलाहबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे.” असे आदेश पोलीस वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत.
२०२० च्या अलाहबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात “कोणताच धर्म भोंग्यांच्या वापराचे समर्थन करत नाही.” असे म्हटले आहे. तर २००० सालच्या सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारे सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणाऱ्या धर्मचरणावर ताशेरे ओढले आहेत.