अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामलल्लाचा अभिषेक होणार आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. पण काहीजणांना मात्र या सगळ्या घडामोडींमुळे अजूनही पोटदुखी सतावते आहे. समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बरक यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. सपा खासदार म्हणाले की, ‘ज्या दिवशी राम मंदिराचे उद्घाटन होईल, त्या दिवशी बाबरी मशीद परत मिळावी म्हणून मी अल्लाहकडे प्रार्थना करेन.’
डॉ. शफीकुर रहमान बरक हे यूपीच्या संभल मतदारसंघाचे खासदार आहेत.२२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी या कार्यक्रमाला अजिबात जाणार नसल्याचे सांगितले. ज्या दिवशी मंदिराचे उद्घाटन होईल, त्या दिवशी बाबरी मशीद परत मिळावी यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आमची मशीद बळाच्या जोरावर पाडण्यात आली आहे, असे सपा खासदार शफीकुर रहमान बरक म्हणाले.
हे ही वाचा:
सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य हिंदू धर्माविषयी ओकली गरळ
मांजामुळे पोलिसाच्या झालेल्या मृत्यूमुळे प्रश्न ऐरणीवर!
मालाडमधील १३०० हेक्टर जमिनीवर होणार विकास!
खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष
सपा खासदाराने नवाच इतिहास रचला आणि ते म्हणाले, ‘जगात सर्व धर्माचे लोक आहेत, पण आजपर्यंत असे काम झालेले नाही.अशा पद्धतीने मशीद पाडल्यानंतर किंवा उद्ध्वस्त केल्यानंतर त्या ठिकाणी मशीद नाहीतर मंदिर बांधले गेले. ही काय माणुसकी आहे, उलट हे मानवतेच्या परंपरेच्या विरोधात आहे. हे धर्माच्या विरोधात आहे आणि संविधानाच्याही विरोधात आहे. ते म्हणाले की, बळजबरीने मशीद उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
शफीकुर रहमान बुर्के बनावट इतिहास सांगताना म्हणतात, सर्वांनी मिळून माझी मशीद उद्ध्वस्त केली. बळाच्या जोरावर आमची मशीद शहीद झाली आणि आता त्यावर मंदिर बांधले जात आहे, न्यायालयाचा निर्णय आमच्या अपेक्षेविरुद्ध होता. आमची बाबरी मशीद आम्हाला परत मिळावी यासाठी मी अल्लाहला प्रार्थना करेन.