28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेष'सरसेनापती हंबीरराव' चा खतरनाक टीजर

‘सरसेनापती हंबीरराव’ चा खतरनाक टीजर

Google News Follow

Related

मराठीतील ‘खतरनाक’ लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या आगामी सरसेनापती हंबीरराव मोहिते या चित्रपटाचे टीजर काल (शनिवार, १८ डिसेंबर) रोजी प्रदर्शित झाले आहे. ‘परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट’ असे म्हणत प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक खात्यावर हा टीजर व्हिडीओ शेअर केला आहे. सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या या टीजरला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या आधी सुपर हिट ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ प्रमाणेच ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपटही ‘सब कुछ प्रविण तरडे’ अशा प्रकारचा असणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा यांचे लेखन हे प्रविण तरडे यांनी केले आहे. या सोबतच चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रविण तरडे यांनीच केले आहे. तर हंबीरराव मोहिते यांच्या मुख्य भूमिकेती प्रविण तरडेच असणार आहेत.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस कार्यकर्ता?

आमदार अतुल भातखळकरांचे उद्धव ठाकरेंना तीन सवाल! मुख्यमंत्री देणार का उत्तर?

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

अमृतसर: सुवर्ण मंदिरात पवित्र गुरु ग्रंथ साहेबच्या विटंबनेचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. मराठीत आगामी काळात येऊ घातलेल्या काही महत्वाच्या ऐतिहासिक चित्रपटांपैकी हा एक असणार आहे. तर प्रवीण तरडे यांच्या मुळशी पॅटर्नच्या यशानंतर आता सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा