‘कायद्याच्या धाकाने नाही तर सर्वांशी प्रेमाने वागल्यानेच पोलिसांची प्रतिमा उंचावेल’

‘कायद्याच्या धाकाने नाही तर सर्वांशी प्रेमाने वागल्यानेच पोलिसांची प्रतिमा उंचावेल’

रत्नागिरी येथे शानिवार, ९ एप्रिल रोजी अ‍ॅडव्होकेट विलास पाटणे यांनी कोकणच्या विकासासंबंधी अनेक विषयांवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये लिहलेल्या लेखांचे संकलन ‘अपरान्त कोकण’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित उपस्थित होते.

कायद्याच्या धाकाने नाही तर सर्वांशी प्रेमाने वागल्यानेच पोलिसांची प्रतिमा अधिक चांगली होईल, असे मत माजी पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी व्यक्त केले. तसेच केवळ पोलिसांची संख्या जास्त असून गुन्हेगारी कमी होत नाही. त्या भागातील लोकांचे चारित्र्य कसे आहे, यावर ते अवलंबून असते. लोकांची वृत्ती सामंजस्याची असेल तर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते आणि वृत्तीच गुन्हे करायची असेल तर गुन्ह्यांचा आलेख वाढत असतो.

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला अशा घटना घडू नयेत म्हणून यंत्रणेने अधिक सतर्क राहायला हवे, असेही दीक्षित म्हणाले. तसेच अधिकारी स्वच्छ असतील तर त्यांचे अनुकरण कर्मचारी करत असतात त्यामुळे अधिकारी वर्गाच्या कृतीवर लोकांचा विश्वासही दृढ होण्यास मदत होते, असे प्रविण दीक्षित म्हणाले.

कोकणात आत्तापर्यंत पिढ्यानपिढ्या राहणारा माणूस हा इतरांना सुपरिचित होता आणि यातून निर्माण झालेल्या सामाजिक दडपणामुळे कोकणातील व्यक्ती ही क्वचितच गुन्हेगारीकडे वळत असे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात असलेला कोकण हा तिथल्या शांततेसाठी व गुन्हेगारी पासून दूर असण्यासाठी प्रसिद्ध होता. कालांतराने काही स्थानिक रोजगाराच्या शोधात शहराकडे वळले.

मात्र, कोकणातील मच्छिमार उद्योग असो अथवा नारळ-सुपारीचा व्यवसाय असो यासाठी फार मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता असते. कोकणात होणारा बंदर विकास, महामार्गांचे जाळे, कोकण रेल्वे अशांच्या बरोबरीनेच परप्रांतातील अनेक व्यक्ती कोकणात दाखल झाल्या आहेत. पारंपारिक कोकणी माणूस या उद्योगांना उपलब्ध नसल्याने आता नेपाळ, म्यानमार, बांगलादेश येथील व्यक्ती कोकणात दाखल होत आहेत. आज अशा बाहेरून आलेल्या व्यक्तींचा इतिहास व कोकणात येण्याचा उद्देश फार क्वचितच तपासून पाहिला जातो त्यामुळे या बाहेरून आलेल्या व्यक्ती ड्रग्ज, माफिया, दहशतवादी कारवाया, नक्षलवादी चळवळव अशा अनेक कारवायांमधे गुंतलेल्या असतात.

हे ही वाचा:

गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

‘मुंबईची पुन्हा होणार तुंबई; फक्त ७५ टक्के नालेसफाई करण्याचे टेंडर’

मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

१९९३ साली मुंबईत झालेल्या बाँबस्फोटात वापरलेली स्फोटके म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड या ठिकाणी उतरविण्यात आली होती आणि तेथून मुंबईला पोचविण्यात आली. कोकणातील संपूर्ण किनारपट्टीवर आणि विशेषतः खाड्यांच्या बाजूला सौर विद्युत चलित कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे तेथे होणारी माणसांची हालचाल टिपली जाईल आणि योग्य तेव्हा त्यांच्यावर कारवाई करता येईल.

Exit mobile version