विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना कोरोना

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना कोरोना

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून राज्यात ओमिक्रॉनबाधितांचेही प्रमाण वाढत आहे. राज्यातील नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. प्रवीण दरेकर यांनी याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

‘बुल्ली बाई’ ऍप प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

‘डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील’

राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही; मात्र निर्बंध कठोर करणार

सोशल मीडियावर दादलानीची खरडपट्टी

प्रवीण दरेकर यांना कोरोनाची सुक्ष्म लक्षणे आढळून आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून उपचार सुरु केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

याआधी राज्यातील अनेक नेत्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनीच माध्यमांशी बोलताना दिली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेते सुजय विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भाजप आमदार अतुल भातखळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version