पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारची ‘सुवर्ण उडी’

भारताच्या झोळीत २६ पदके

पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारची ‘सुवर्ण उडी’

पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची भर करत आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात २५ पदके होती, यामध्ये वाढ होवून ती संख्या २६ वर गेली आहे. भारतीय खेळाडू प्रवीण कुमारने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T६४ स्पर्धेत सुवर्णपदक सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला.

प्रवीणने २.०८ मीटर उडी मारत आशिया खंडात मोठा विक्रम केला. आशियातील कोणत्याही पॅरालिम्पिक स्पर्धेतील हा सर्वोत्तम विक्रम आहे. प्रवीण हा उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आहे. मरियप्पन थंगावेलू नंतर, प्रवीण पॅरालिम्पिक स्पर्धेच्या उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला. प्रवीणने T६४ प्रकारात ही कामगिरी केली आहे. या प्रकारात एक पायाने लहान असलेल्या खेळाडूंचा सहभाग असतो.

हे ही वाचा : 

चक्रव्यूह तोडता येईल का?

कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये

मौलवीकडून ११ वर्षीय मुलीवर तीन महिने अत्याचार!

‘शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ, लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे गैर’

पॅरालिम्पिकमध्ये अमेरिकेच्या डेरेक लोकिडेंटला २.०६ मीटरच्या उडीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी उझबेकिस्तानचा ॲथलीट टेमुरबेक गियाझोव्हने २.०४ मीटर उडी मारून कांस्यपदक पटकावले. प्रवीण जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने टोकियोमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. प्रवीणने आपल्या सर्वोत्तम कामगिरीने आशिया खंडात मोठा विक्रम केला आहे.

भारताच्या नावावर आता एकूण २६ पदके आहेत. ज्यामध्ये ६ सुवर्ण, ८  रौप्य आणि १२ कांस्य पदके आहेत. प्रवीणच्या आधी अवनी लेखरा (नेमबाजी), नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अँटिल (ॲथलेटिक्स), हरविंदर सिंग (तिरंदाजी) आणि धरमबीर (ॲथलेटिक्स) यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत.

Exit mobile version