नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये १३ ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी जाहिर झालेल्या भारतीय पुरूष संघात महाराष्ट्रातील पाच तर महिला संघात तिन खो-खोपटूंची निवड झाली आहे. पुरूष संघाच्या कर्णधारपदी प्रतिक वाईकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या निवड चाचणीनंतर आज पुरूष आणि महिलांचे संघ जाहिर करण्यात आले. पुरूष संघात प्रतिक वाईकर (कर्णधार), सुरेश गरगटे, आदित्य गनपुले, रामजी कश्यप, अनिकेत पोटे तर महिला गटात प्रियंका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड यांची निवड झाली आहे. पुरूष संघाच्या प्रशिक्षकपदी शिरीन गोडबोले आणि महिलांच्या प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे.
भारतीय संघाची निवड महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव व खजिनदार गोविंद शर्मा, एम. सीतारामी रेड्डी, उपकार सिंग विर्क, सुषमा गोळवलकर, एस. एस. मलिक, डॉ. मुन्नी जून (एमडीयू), नितुल दास, वंदना पी. शिंदे, आनंद पोकार्डे तर भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल आणि सरचिटणीस पदसिध्द असलेल्या समितीने केली आहे.
महाराष्ट्राच्या निवडल्या गेलेल्या खेळाडूंचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय पुरूष संघ ः प्रतीक वाईकर (कर्णधार), सचिन भार्गो, सिवा पोथिर रेड्डी, निखिल बी., सुमन बर्मन, पाबनी साबर, सुयर गरगटे, आदित्य गणपुले, आकाश कुमार, अनिकेत पोटे, मेहूल, रामजी कश्यप, गोवथम एम. के., शुभ्रमणी व्ही, एस. रॉकसन सिंग. राखीव ः अक्षय भांगरे, राजवर्धन पाटील, विश्वनाथ जानकीराम.
महिला संघ ः प्रियांका इंगळे (कर्णधार), भिलार देवजीभाई, चैत्रा बी, अंशु कुमारी, मिनु, अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, निर्माला भाटी, निता देवी, सुभश्री सिंग, मेघी माझी, वैष्णवी बजरंग, मोनीका, नसरीन शेख, नाझी बीबी. राखीव ः संपदा मोरे, रितीका सिलोरीया, प्रियांका भोपी.
हे ही वाचा:
उबाठा पवारांच्या काँग्रेसला वाकुल्या…
बकरे की अम्मा कब तर खैर मनायेगी?
प्रयागराज महाकुंभात साडेतीन वर्षांचा श्रवण बाळ!
खो खो विश्वचषकाचे वेळापत्रक
ही स्पर्धा १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत पुरुष व महिलांचे २३ देशांचे ३९ संघ सहभागी झाले आहेत. पुरुष गटात २० तर महिला गटात १९ संघ सहभागी झाले आहेत. भारत वि नेपाळ या पुरुषांच्या सामन्याने खो-खो विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. तर महिला सलामीचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे.