‘महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावर चढून पक्षाचा लावला झेंडा’

समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा प्रताप

‘महाराणा प्रतापांच्या पुतळ्यावर चढून पक्षाचा लावला झेंडा’

उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे.समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर चढून पक्षाचा झेंडा फडकवला आहे.या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली.सपाच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य राष्ट्रनायकांचा अपमान असल्याचे मुख्यमंत्री योगींनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पक्षाचा शनिवारी (४ एप्रिल) मैनपुरीमध्ये रोड शो पार पडला.यावेळी उपस्थित समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी अशोभनीय घोषणाबाजी करत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर चढण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यकर्त्यांनी पुतळ्यावर चढून आपल्या पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी फडकावला.त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये पक्षाचे कार्यकर्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर पाय ठेवून वरती चढून पक्षाचा झेंडा पुतळ्यावर ठेवून फडकवताना दिसत आहेत.या घटनेनंतर समाजवादी पक्षावर भाजपने जोरदार टीका केली.या प्रकरणी पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या १०० कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल केला आहे.

हे ही वाचा:

गुजरातमधून अटक केलेला मौलवी ओवेसीचा अनुयायी, इंडोनेशिया-कझाकस्तानमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात

मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश!

‘पाकिस्तान की औकाद नहीं कि भारत के चुनाव में दखल दे सके’

६ ऑक्टोबरला टी- २० विश्वचषक स्पर्धेत भारत- पाकिस्तान महिला संघ भिडणार!

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील सपा पक्षावर टीका केली आहे.ते म्हणाले की, ज्या प्रकारे समाजवादी पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आला आहे, ते अत्यंत निंदनीय आहे.मी याचा निषेध करतो.हे केवळ समाजवादी पक्षच नाही राहुल गांधी देखील अशा प्रकारचे कृत्य करत आहेत.ते पुढे म्हणाले, राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये गेले होते तेव्हा कार्यकर्त्यांकडून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देण्यात आला. मात्र, राहुल गांधी यांनी पुतळा घेण्यास नकार दिला.हे लोकं राष्ट्रनायकांचा सन्मान करणार नाहीत, आतंकवादीयांचा सन्मान करतील.दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडून सपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महाराणा प्रताप यांचा पुतळ्याची देखील स्वच्छता करण्यात आली आणि पुतळा पाण्याने धुवून काढला आहे.

Exit mobile version