सर्वोच्च न्यायालयातून न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले एम. आर. शहा यांनी सन २०१८मध्ये ‘मोदी हे दूरदर्शी नेता’ हे विधान केल्याबाबत आपल्याला पश्चाताप वाटत नसल्याचे स्पष्ट केले. तेव्हा शहा यांनी केलेल्या विधानामुळे वादाचे मोहोळ उठले होते आणि ते सरकारसमर्थक असल्याचा आरोप काहींनी केला होता.
शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलचे त्यांचे विचार आणि कामकाजाबाबत येणाऱ्या संबंधांबद्दल सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. आर. शाह यांना एकदा सरकार समर्थक असल्याच्या आरोपावरून लक्ष्य करण्यात आले होते. त्यांनी २०१८मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती. सोमवारी निवृत्त झालेले न्यायमूर्ती शाह यांनी ते पंतप्रधानांच्या केलेल्या स्तुतीवर ठाम असून काही लोकांच्या टीकेची त्यांना काळजी नाही, असे स्पष्ट केले.
सन २०१८मध्ये गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान न्या. एम. आर. शहा यांनी पंतप्रधान मोदी हे आमचे सर्वांत लोकप्रिय, प्रिय आणि दूरदर्शी नेते आहेत, अशी प्रशंसा केली होती. त्याबाबत बोलताना त्यांनी माझ्या त्या विधानामुळे न्यायालयीन बाजूने माझ्या निर्णयक्षमतेवर परिणाम झाला का, हे दाखवून द्या, असे आव्हान दिले.
ते म्हणाले, ‘ज्यांना काही करायचे नाही ते न्यायाधीशांवर टीका करतात,’ अशीही टीका त्यांनी केली. या विधानाबद्दल त्यांना पश्चात्ताप झाला का, याबद्दलही त्यांनी मत मांडले. ‘खेद वाटण्याचा प्रश्नच कुठे आहे, मी काय चुकीचे बोललो आहे?”
हे ही वाचा:
वानखेडेंच्या सहकाऱ्याने ३० लाखांचे घड्याळ चोरले?
सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री
मालाड कुरार व्हिलेज येथे मिनी फायर स्टेशन
श्रद्धा वालकरला श्रद्धांजली वाहण्यासाठी मूक रॅलीचे आयोजन
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संबंध येत होता का?, यावरही त्यांनी बाजू मांडली. ‘न्यायिक बाजूने एकत्र काम करण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे ते म्हणाले. न्यायाधीश म्हणून माझ्या संपूर्ण कारकिर्दीत राजकारण्यांशी जवळचे संबंध नाहीत आणि मी नेहमीच भीती न बाळगता, कोणा ठराविक बाजूने झुकणारा किंवा पूर्वग्रहदूषित भावना मनात न ठेवता न्यायाधीश म्हणून कर्तव्य बजावले. आम्ही कोणाची सत्ता आहे, याचा विचार करत नाही, तर जे देशाच्या हिताचे आहे, असा निर्णय देतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.